मुंबई : क्रिकेटर युवराज सिंहच्या लग्नात विराट कोहली, झहीर खान, आशिष नेहरा, अनिल कुंबळेसह अनेक दिग्गज क्रिकेटर उपस्थित होते. पण युवीच्या लग्नाला हजरे न लावणाऱ्यांमध्ये एक नावाची जोरदार चर्चा होती. ते नाव म्हणजे वन डे क्रिकेट कर्णधार एम एम धोनी. धोनी भारतात असूनही तो ना युवराजच्या चंदीगडमधील लग्नाला ना गोव्यातील बीच वेडिंगला हजर राहिला. मैदानात दोघांमध्ये चांगली बॉण्डिंग आहे, पण मैदानाबाहेर ते दोघे एकत्र फार कमीच वेळा दिसतात.

 

युवराजच्या वडिलांमुळे धोनी गैरहजर?

हे सगळं युवराज सिहंचे वडील योगराज सिंह यांच्यामुळे झालं आहे. 2015 च्या वन डे वर्ल्ड कप संघात युवराजची निवड न झाल्याने योगराज यांनी महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला होता.

"धोनी अतिशय अहंकारी आहे. ज्याप्रकारे रावणाचा अहंकार एक दिवस नष्ट झाला, तसंच धोनीच्या बाबतीतही घडेल. तो स्वत:ला रावणापेक्षाही जास्त श्रेष्ठ समजतो. मी माझ्या आयुष्यात असा वाईट व्यक्ती कधीही पाहिला नाही. धोनी एक दिवस भीक मागेल," असा संताप योगराज सिंह यांनी व्यक्त केला होता.




धोनीला थोबाडात मारली असती

"धोनी काहीही नाही. मीडियाने त्याला क्रिकेटचा देव बनवला आहे. आज धोनी मीडियाचा आदर करत नाही. जर मी पत्रकार असतो तर त्याला थोबाडात दिली असती," असंही योगराज सिंह म्हणाले होते.

7 डिसेंबरला दिल्लीत रिसेप्शन

- आता युवराज सिंह आणि हेजल कीच यांच्या लग्नाचा एकच कार्यक्रम शिल्लक आहे. 7 डिसेंबरला दिल्लीत त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे.

- याआधी 30 नोव्हेंबरला चंडीगडमध्ये शिख रीति-रिवाजांनुसार युवराज आणि हेजलचं लग्न झालं होत. त्यानंतर 2 डिसेंबरला गोव्यात हिंदू पद्धतीनुसार विवाह पार पडला.

- यानंतर झालेल्या कॉकटेल पार्टीत विराट, झहीर, आशिष नेहरासह अनेक भारतीय क्रिकेटरही हजर होते.

- तसंच चंडीगदमध्ये 29 नोव्हेंबरला झालेल्या संगीतमध्येही संपूर्ण भारतीय टीम उपस्थित होती.