न्यूयॉर्क : लायनेल मेसीने अखेरची कीक लगावलेल्या फुटबॉलचा लिलाव होणार आहे. 27 हजार युरो म्हणजे अंदाजे 20 लाख रुपयांना या बॉलची विक्री होऊ शकते.

 
लायनेल मेसीला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतल्या अखेरच्या पेनल्टी किकवर गोल करण्यात अपयश आलं होतं. कोपा अमेरिकातल्या चिलीविरुद्धच्या अंतिम सामन्यात मेसीनं मारलेली किक ही थेट प्रेक्षकांमध्ये गेली होती.

 
मेसीनं मारलेला बॉल हा पेड्रो वॅसक्वेज नावाच्या चाहत्यानं पकडला होता. पेड्रो आता याच बॉलचा लिलाव करणार असून, त्यानं या बॉलची किंमत 27 हजार युरो म्हणजे भारतीय चलनात सुमारे 20 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

 
लायनल मेसीला करचुकवेगिरी प्रकरणी स्पेनमधल्या कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. मेसीला कोर्टाने 21 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मेसी आणि त्याच्या वडिलांना कोर्टानं 37 लाख युरोंचा दंडही ठोठावलाय. मात्र ते वरच्या कोर्टात धाव घेणार असून त्यांना शिक्षेतून सूट मिळण्याचीही शक्यता आहे.

 

 

लायनल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. कोपा अमेरिका स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मेस्सीने सांगितलं.

 

 

लायनल मेस्सीच्यानावे अनेक विक्रम आहेत. 2008 मध्ये ऑलिम्पिकमध्ये त्याने अर्जेंटिनासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याशिवाय बार्सिलोना क्बलला विक्रमी आठ वेळा स्पेनच्या ला लीगा या प्रतिष्ठित स्पर्धेचं विजेतेपद जिंकून दिलं आहे. मात्र अर्जेंटिनासाठी त्याला एकही विजेतेपद मिळवता आलं नाही.

 

संबंधित बातम्या :


 

फुटबॉलपटू लायनल मेसीला 21 महिन्यांचा कारावास


टॅक्स चोरी प्रकरणी मेसी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार


लायनल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा


मेसी, निर्णय मागे घे, राष्ट्राध्यक्षांची विनंती