... म्हणून आम्ही जिंकलो : रॉस टेलर
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2017 09:17 PM (IST)
भारतीय गोलंदाजांवरील दबाव वाढवण्यात यशस्वी झाल्यामुळे विजय मिळाला, असं रॉस टेलरने सांगितलं.
मुंबई : न्यूझीलंडचा शतकवीर फलंदाज टॉम लॅथमने स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा सल्ला ऐकला. ज्यामुळे भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांची लय बिघडली, असं न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने सांगितलं. रॉस टेलरने 95 धावा केल्या आणि लॅथमसोबत 200 धावांची अभेद्य भागीदारी रचली. ज्यामुळे टीम इंडियाने दिलेलं 281 धावांचं लक्ष्य सहजपणे पार करता आलं. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेला हा सामना न्यूझीलंडने 6 विकेट्सने जिंकला.