मुंबई : बीसीसीआयकडून कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची नवीन यादी काल (बुधवार) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे. पण ए प्लस या यादीत महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आलेलं नसल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.


या कॉन्ट्रॅक्टमध्ये ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी, ए श्रेणीच्या खेळाडूंना 5 कोटी, बी श्रेणीच्या खेळाडूंना 3 कोटी तर सी श्रेणीच्या खेळाडूंना 1 कोटींचं मानधन जाहीर करण्यात आलं.

धोनीला ए ग्रेडमध्ये ठेवण्यात आल्याने आता त्याला 5 कोटी मानधन वर्षाला मिळणार आहे. त्याला ए प्लस यादीत स्थान देण्यात न आल्याने सध्या याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत आता काही नवी माहिती समोर आली आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो आता फक्त वनडे आणि टी-20 सामनेच खेळतो. त्यामुळे धोनीला ए प्लस यादीत स्थान देण्यात आलं नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि बुमरा हे सध्या तीनही फॉर्मेटमध्ये खेळतात. त्यामुळे या पाचही खेळाडूंना ए प्लस यादीत स्थान देण्यात आलं आहे.
खेळाडू (ए प्लस ग्रेड, मानधन 7 कोटी)

विराट कोहली

रोहित शर्मा

शिखर धवन

भुवनेश्वर कुमार

जसप्रीत बुमरा

खेळाडू (ए ग्रेड, मानधन 5 कोटी)

रविचंद्रन अश्विन

रवींद्र जाडेजा

मुरली विजय

चेतेश्वर पुजारा

अजिंक्य रहाणे

महेंद्रसिंह धोनी

रिद्धीमान साहा

खेळाडू (बी ग्रेड, मानधन 3 कोटी)

लोकेश राहुल

उमेश यादव

कुलदीप यादव

यजुवेंद्र चहल

हार्दिक पंड्या

इशांत शर्मा

दिनेश कार्तिक

खेळाडू (सी ग्रेड, मानधन 1 कोटी)

केदार जाधव

मनीष पांडे

अक्षर पटेल

करुण नायर

सुरेश रैना

पार्थिव पटेल

जयंत यादव

संबंधित बातम्या : 

कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची यादी जाहीर, मानधनात तब्बल 200 टक्के वाढ

बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीचं नाव वगळलं