कानपूर : टीम इंडियाचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीच्या वडिलांचं निधन झालं. शमीचे वडील तौसीफ अली यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

वडिलांच्या निधनाची बातमी समजताच मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धचा दौरा अर्धवट सोडून कानपूरहून अमरोहाला त्याच्या घरी रवाना झाला आहे. शमीचे वडील 5 जानेवारीपासून रुग्णालयातच होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

त्यावेळी मोहम्मद शमीने वडिलांसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट करुन त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर तो सातत्याने ट्वीट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती देत होता.

https://twitter.com/MdShami11/status/819827892699820032

गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धचा चौथा आणि पाचवा कसोटी सामना खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी शमी बंगळुरुमधील एनसीएमध्ये होता.

26 वर्षीय मोहम्मद शमीने 22 कसोटी आणि 47 वन डे सामन्यात भारताचा प्रतिनिधीत्त्व केलं आहे. कसोटीमध्ये 76 आणि वन डेमध्ये 87 विकेट्स घेतल्या आहेत.