देहरादून : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कार अपघातात जखमी झाला. त्याच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत. देहरादूनहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली.
सरावासाठी शमी देहरादूनला अभिमन्यू क्रिकेट अकादमीत गेला होता. सराव करुन दिल्लीला परतत असतानाच त्याच्या कारला अपघात झाला. देहरादून हे शमीचं आवडतं शांत ठिकाण आहे. त्यामुळे त्याच्या कौटुंबीक जीवनात जो वाद चालू आहे, त्यातून सावरण्यासाठी तो देहरादूनला जाऊन क्रिकेटचा सराव करतो.
मोहम्मद शमी यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र आयपीएलपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला. शमीची पत्नी हसीन जहाने त्याच्यावर कौटुंबीक छळाचे आणि इतर तरुणींशी संबंध असल्याचे आरोप केले होते. शिवाय मॅच फिक्सिंगचाही आरोप तिने केला, ज्यातून बीसीसीआयने शमीला क्लीनचिट दिली.
हसीन जहाने आरोप केल्यानंतर बीसीसीआयने शमीचा कॉन्ट्रॅक्टमध्येही समावेश केला नव्हता. मात्र, नंतर बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने शमीला क्लीनचिट दिल्यानंतर त्याचा पुन्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला.
कार अपघातात मोहम्मद शमी जखमी, डोक्याला दहा टाके
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 11:10 AM (IST)
देहरादूनहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली. सरावासाठी शमी देहरादूनला अभिमन्यू क्रिकेट अकादमीत गेला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -