विराट कोहलीच्या नेतृत्त्वात मिळवलेला हा सलग नववा विजय ठरला. भारतीय कर्णधारांच्या सलग वन डे सामने जिंकण्याच्या यादीत धोनीच्या नावावरही एवढेच सामने आहेत. म्हणजेच विराट कोहलीने 11 वर्षांनंतर धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
धोनीने नोव्हेंबर 2008 ते फेब्रुवारी 2009 या काळात सलग नऊ वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच विराट कोहलीने यावर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात सलग नऊ वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला.
सलग सर्वाधिक वन डे जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाने सलग सर्वाधिक 21, दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा 12, पाकिस्तान 12 आणि वेस्ट इंडिजने सलग 11 वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.