केवळ दोनच मिनिटं शॉवर, द.आफ्रिकेत टीम इंडियाला सूचना
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2018 10:49 AM (IST)
प्रखर सूर्यप्रकाशात मैदानावर सराव करुन घामेजलेल्या अंगाने हॉटेलवर परतलेल्या टीम इंडियाला या सूचना मिळाल्या.
केप टाऊन, दक्षिण आफ्रिका : आंघोळ करताना दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ शॉवर घेऊ नका, अशा सूचना टीम इंडियाला देण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंना स्थानिक प्रशासनाकडून हे नियम जारी करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश शहरांना सध्या दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केपटाऊन शहराच्या स्थानिक प्रशासनानं सर्व नागरिकांना एका दिवसाला 87 लीटरपेक्षा जास्त पाणी वापरण्यास मनाई केली आहे. याचीच झळ भारतीय खेळाडूंनाही बसली आहे.