मुंबई : महेंद्रसिंह धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन टीम इंडियाने पहाटे 3 च्या सुमारास झिम्बाब्वेकडे प्रस्थान केलं.

 

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक


 

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजला रवाना होईल.

 

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार?


या दौऱ्यात प्रामुख्याने नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. धोनी वगळता एकही अनुभवी खेळाडू या दौऱ्यात नाही.

 

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल

 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार

 

झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक

11 जून – पहिला वन डे सामना

13 जून – दुसरा वन डे सामना

15 जून – तिसरा वन डे सामना

18 जून – पहिला टी-ट्वेन्टी सामना

20 जून – दुसरा टी-ट्वेन्टी सामना

22 जून – तिसरा टी-ट्वेन्टी सामना