पुण्यातल्या अशाच एका फॅननं आपली दुचाकीला सैराटमय करुन टाकलं आहे. स्वप्नील भोंडवे असं त्याचं नाव असून त्यानं नव्या कोऱ्या गाडीला सैराट करुन टाकलं आहे.
स्वप्नीलने गाडीवर आर्ची आणि परशासह नागराज मंजुळेची फोटो गाडीवर लावले आहेत. यासाठी स्वप्नीलला 8 हजार रुपये खर्च आला आहे.
32 वेळा पाहिला सैराट सिनेमा
सैराटने प्रेक्षकांच्या मनावर छाप तर सोडलीच आहे. त्यामुळेच सैराट कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. प्रेक्षक पुन्हा पुन्हा हा सिनेमा पाहत आहेत. स्वप्नील सिनेमाच्या एवढा प्रेमात पडला आहे की, त्याने आतापर्यंत तब्बल 32 वेळा सैराट सिनेमा पाहिला आहे.
स्वप्नीलची ही सैराट गाडी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. एवढंच नाहीतर गाडी फिरवण्यासाठी पुणेकरांनी स्वप्नीलकडे चक्क बुकिंग करायला सुरुवात केली आहे.
पाहा व्हिडिओः