नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या 5 वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन वन डेंसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोटेशन पॉलिसीनुसार फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेल्या गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. काही अपवाद वगळता श्रीलंका दौऱ्यातीलच संघ यावेळीही निवडण्यात आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला 17 सप्टेंबरपासून चेन्नईतून सुरुवात होणार आहे. तर पहिला सराव सामना 12 सप्टेंबरला चेन्नईत खेळवण्यात येईल. भारतीय संघ :
  1. विराट कोहली (कर्णधार)
  2. रोहित शर्मा
  3. शिखर धवन
  4. लोकेश राहुल
  5. मनीष पांडे
  6. केदार जाधव
  7. अजिंक्य रहाणे
  8. महेंद्रसिंह धोनी
  9. हार्दिक पंड्या
  10. अक्षर पटेल
  11. यजुवेंद्र चहल
  12. जसप्रीत बुमरा
  13. कुलदीप यादव
  14. भुवनेश्वर कुमार
  15. उमेश यादव
  16. मोहम्मद शमी