कोलकाता : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा धुव्वा उडवून एका विक्रमी कामगिरीची नोंद केली. टीम इंडियाचा भारतीय भूमीवरचा हा सलग 12 वा कसोटी विजय ठरला. 2012 पासून टीम इंडियाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.


मायदेशात सलग 12 कसोटी मालिका जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने दोन वेळा घरच्या मैदानावर सलग दहा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. भारतानं ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम मोडीत काढला होता.

2012 पासून भारताचे मायदेशातले कसोटी मालिकाविजय

1. भारत वि. ऑस्ट्रेलिया मालिका भारताने 4-0 ने विजयी

2. भारत वि. वेस्ट इंडिज मालिका भारताने 2-0 ने विजयी

3. भारत वि. दक्षिण आफ्रिका मालिका भारताने 3-0 ने विजयी

4. भारत वि. न्यूझीलंड मालिका भारताने 3-0 ने विजयी

5. भारत वि. इंग्लंड मालिका भारताने 4-0 ने विजयी

6. भारत वि. बांगलादेश मालिका भारताने 1-0 ने विजयी

7. भारत वि. ऑस्ट्रेलिया मालिका भारताने 2-1 ने विजयी

8. भारत वि. श्रीलंका मालिका भारताने 1-0 ने विजयी

9. भारत वि. अफगाणिस्तान मालिका भारताने 1-0 ने विजयी

10. भारत वि. वेस्ट इंडिज मालिका भारताने 2-0 ने विजयी

11. भारत वि. दक्षिण आफ्रिका मालिका भारताने 3-0 ने विजयी

12. भारत वि. बांगलादेश मालिका भारताने 2-0 ने विजयी