कँडी (श्रीलंका) : टीम इंडियाने कसोटी मालिकेत 3-0 ने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर आज स्वातंत्र्य दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने स्वातंत्र्य दिनानिमित्त कँडीमध्ये ध्वजारोहण केलं.


कँडीमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात टीम इंडियासोबत सपोर्टिंग स्टाफनेही सहभाग घेतला. ज्या हॉटेलमध्ये टीम इंडियाचा मुक्काम आहे, त्या हॉटेलच्या परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

कसोटी मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडिया आता पाच वन डे सामन्यांची मालिका आणि एका टी-20 सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

श्रीलंकेहून परतल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेसोबत सीरीज खेळेल. त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

पाहा व्हिडीओ :

https://twitter.com/BCCI/status/897324993670897664?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Fsports%2Fvideo-team-india-celebrates-71st-independence-day-in-sri-lanka-virat-kohli-hoist-national-flag-671443