मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं इंग्लंडला मागे टाकून वन डे सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली आहे. विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघांमधला सामना रविवारी खेळवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वन डे क्रमवारीत मिळालेला नंबर वन टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावणारा आहे.


ताज्या क्रमवारीत टीम इंडियानं 123 रेटिंग गुणांसह आयसीसी क्रमवारीत नंबर वन मिळवला. इंग्लंडची 122 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडला 114 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताला आजच्या विश्वचषक वेस्ट इंडिजकडून हार स्वीकारावी लागली, तर नंबर वनचा आनंद अल्पजीवी ठरेल.


विश्वचषकातील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाला दोन गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात 122 गुण आहेत. विश्वचषकात इंग्लंडला पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव सहन करावा लागला आहे.


...तर इंग्लंड पुन्हा नंबर वन

विश्वचषकात भारताचा सामना यजमान इंग्लंडविरुद्ध येत्या 30 जून रोजी आहे. या सामन्या नंबर वन स्थानी इंग्लड राहणार भारत हे स्पष्ट होईल. जर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा आजचा सामना जिंकून इंग्लंडचाही पराभव केल्यास टीम इंडियाचे 124 गुण होतील. तर इंग्लंड 121 गुणांवर पोहोचेल.

जर इंग्लंडने भारताविरुद्धचा सामना जिंकला तर 123 गुणांसह ते पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतील आणि टीम इंडिया 122 गुणांसह दुसऱ्या स्थानी येईल.