एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सीनियर निवड समितीच्या बैठकीत भारतीय संघ जाहीर करण्यात आला.
महत्त्वाचं म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंहचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. तर दिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनचा वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे संघात स्थान मिळवू शकलेला नाही.
भारताच्या टी-ट्वेन्टी संघात सुरेश रैना आणि आशिष नेहराचा समावेश झाला आहे. मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे तसंच अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन हे दोघंही दुखापतीतून सावरले असून, रहाणे वन डे मालिकेत तर अश्विन वन डे आणि ट्वेन्टी20 मालिकेत सहभागी होईल.
वन डे भारतीय संघ : विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), के एल राहुल, शिखर धवन, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव
टी-ट्वेण्टी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मनदीप सिंह, के एल राहुल, युवराज सिंह, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा
संबंधित बातम्या