T20 World Cup 2024 Schedule : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.






या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार 


भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.






भारतीय संघाचे वेळापत्रक


5 जून – वि आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून - वि.पाकिस्तान, न्यूयॉर्क
12 जून - वि अमेरिका, न्यूयॉर्क
15 जून - वि.एस. कॅनडा, फ्लोरिडा


T20 वर्ल्ड कप 2024 चा फॉरमॅट असा असेल


आगामी T20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.






विश्वचषकाचा गट असा असेल 



  • अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

  • ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

  • क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

  • ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ


आगामी T20 विश्वचषक मागील T20 विश्वचषकापेक्षा खूपच वेगळा असेल आणि त्यात पात्रता फेरी खेळली जाणार नाही किंवा सुपर-12 टप्पाही होणार नाही. गेल्या T20 विश्वचषकात एकूण 16 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी 8 संघांना सुपर-12 टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळाला होता. पात्रता फेरीतून चार संघांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या