Rohit Sharma Injured : टीम इंडियाच्या (Team India) कॅम्पमधून एक चिंता वाढविणारी बातमी आहे. क्रीडाविश्वातील माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला आहे. अॅडलेडमध्ये नेटवर फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला दुखापतीमुळे वेदना होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) मध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी रोहितची दुखापत ही टीम इंडियासाठी एखाद्या वाईट बातमीपेक्षा कमी नाही. मात्र, ही दुखापत किती गंभीर आहे? याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. टीमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोहित शर्माच्या दुखापतीची दखल घेतली आहे.


 






सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत


भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. रोहितची दुखापत फारशी गंभीर नसावी, अशी आशा बाळगायला हवी. आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माला कोणत्या प्रकारची दुखापत झाली? त्याला कुठे दुखापत झाली? मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कर्णधाराला फलंदाजीच्या सरावात उजव्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला वेदना होताना दिसल्या. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संघाचे फिजिओ धावत धावत नेटवर गेले, त्यांना रोहित शर्माच्या दुखापतीची माहिती मिळाली.


 






अॅडलेडमधील ही छायाचित्रे भारतीय क्रिकेट चाहत्यांना नक्कीच धक्का देणारी आहेत, परंतु सध्या तरी या दुखापतीचे गांभीर्य किती आहे? याबद्दल कोणतीही बातमी आलेली नाही. रोहितच्या दुखापतीबाबत काही दिलासादायक अपडेट मिळण्याची चाहते वाट पाहत आहे.


 



इतर महत्वाच्या बातम्या


T20 World Cup 2022 : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यावेळी पाऊस आला तर? आयसीसीनं केली आहे खास योजना