Ind vs AFG T20 World Cup 2021 Live Updates: भारताचा अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय
भारतीय संघाने या स्पर्धेत अद्याप आपले विजयाचे खाते उघडले नसले तरी अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन विजयांची नोंद केली आहे.
टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 33 व्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर (IND vs AFG) 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
अफगाणिस्तानच्या संघाचा दुसरा विकेट्स पडला आहे. मोहम्मद शाहजाद पाठोपाठ हजरतउल्लाह जजई आऊट झाला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर- 13/2 (3.3)
टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध आक्रमक खेळी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने अफगाणिस्तान समोर 211 धावांचे लक्ष्य दिले आहे.
केएल राहुलच्या रुपात भारतीय संघाला दुसरा झटका लागला आहे. केएल राहुलने 48 बॉलमध्ये 69 धावा केल्या. भारताचा स्कोर- 148/2 (16.4)
भारताला पहिला झटका लागला असून रोहित शर्मा 74 धावा करून आऊट झाला आहे. भारताचा स्कोर- 142/1 (15)
अफगाणिस्तान विरुद्ध भारताचे सलामीवीर रोहित शर्माच्या पाठोपाठ केएल राहुलनेही अर्धशतक ठोकले आहे.
अफगाणिस्तानच्या संघाने त्यांच्या गोलंदाजीमध्ये बदल करत हामिद हसनला गोलंदाजी करण्यासाठी बोलावून घेतले. त्याच्या गोलंदाजीवर भारतीय सलामीवीरांनी संयमी खेळी करत 5 धावा काढल्या. 4 षटकानंतर भारतीय संघाचा स्कोर 35/0
अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारताने पुन्हा टॉस गमावलाय. तर, अफगाणिस्ताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारताने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टॉस गमावला होता. या दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झालाय.
पार्श्वभूमी
यंदाच्या टी-20 विश्वचषकात आजचा दुसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना अबुधाबीच्या शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत अद्याप आपले विजयाचे खाते उघडले नसले तरी अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन विजयांची नोंद केली आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर आज कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करावी लागेल.
भारत आणि अफगाणिस्तान आज तिसऱ्यांदा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आमने- सामने येणार आहेत. यापूर्वी 2010 टी-20 विश्वचषक आणि 2012 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झालाय. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. अफगाणिस्तानच्या संघाने 2010 मध्ये भारताविरुद्धच टी-20 विश्वचषकात पदार्पण केले. या सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून अफगाणिस्तानच्या संघाला मात दिली. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानच्या संघाला 23 धावांनी पराभूत केले. परंतु, या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. तर, अफगाणिस्तानने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रभावित केलंय.
भारत संभाव्य संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह.
अफगाणिस्तान संभाव्य संघ-
हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, उस्मान घनी, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (क), गुलबदिन नायब, रशीद खान, करीम जनात/मुजीब उर रहमान, हमीद हसन आणि नवीन-उल- हक.
IND vs AFG: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) सुपर-12 फेरीत भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात आज 'करो या मरो'ची लढत पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर, अफगाणस्तान संघाची जबाबदारी मोहम्मद नबीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आजचा सामना खूपच अधिक रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. कारण, दोन्ही संघांकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे सामना बदलण्यासाठी सक्षम आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12चा हा सामना शेख जायद मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.00 वाजता नाणेफेक होईल. यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 7.30 वाजता या सामन्याला सुरवात होईल. भारत-न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. याशिवाय, www.abplive.com वर या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स मिळवता येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -