Paris Olympics 2024 Maharashtra Athletes Swapnil Kusale: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) आज भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा झालं. नेमबाज स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मराठमोठ्या स्वप्नील कुसाळेने लक्ष्यवेधी नेमबाजीने स्वप्नीलने भारताच्या गळ्यात कांस्य पदकाची कमाई करून दिली.या विजयानं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत मराठमोठ्या स्वप्नीचे कौतुक केले आहे. स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये तू अद्वितीय कामगिरी केली आहेस. तुझ्या कामगिरीने प्रत्येत भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी स्तुती केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान आपल्या ट्वीटमध्ये? (PM Modi Tweet For Swapnil Kusale)
पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, स्वप्नील कुसाळेची अद्वितीय कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन... 50 मीटर रायफल शुटींमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. तू मिळवलेल्या यशानंतर आज प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
भारताच्या स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल शुटींमध्ये कांस्य पदक पटकावलं. 451.4 गुणांची कमाई करत स्वप्नीलने कांस्य पदकावर नाव कोरलं. विशेष म्हणजे खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्य पदकानंतर महाराष्ट्राच्या सुपुत्राने जिंकलेलं हे वैयक्तिक पदक आहे. पदकासाठी अंतिम सामना हा तीन फेऱ्यांत झाला.. निलींग पोझिशन, प्रोन पोझिशन, स्टँडिंग पोझिशन अशा तीनही फेऱ्यांनंतर एलिमिनेशन राऊंड खेळली जाते. निलींग पोझिशनमध्ये स्वप्नीलने 153.3 गुणांची कमाई केली. प्रोन पोझिशनमध्ये 156.8 गुणांची कमाई केली. तर स्टँडिंग पोझिशनमध्ये त्याने 101.5 गुणांची कमाई केली. एलिमिनेशन राऊंडमध्ये स्वप्नीलने 10.5, 9.4, 9.9 आणि 10 गुणांची कमाई केली. 10 गुणांची कमाई केली. या लक्ष्यवेधी नेमबाजीने स्वप्नीलने भारताच्या गळ्यात कांस्य पदकाची कमाई करून दिली.
Swapnil Kusale Mother Reaction Video : लेकाचा विजय पाहून स्वप्नीलच्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी
हे ही वाचा :