सिंगापूर : रशियाची सुप्रसिद्ध टेनिसपटू स्वेतलाना कुझ्नेत्सोवानं चक्क टेनिस कोर्टवरच आपल्या केसांना कात्री लावली आहे. स्वेतलानाने खेळादरम्यान स्वतःच स्वतःचा हेअरकट केला.
सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत गतवेळच्या विजेत्या अॅग्निएस्का रद्वांस्काविरुद्धच्या साखळी सामन्यात ही घटना घडली. खेळताना केसांची वेणी अडचणीची ठरु लागल्यानं कुझनेत्सोव्हानं ती कापण्याचा निर्णय घेतला.
अखेर कुझनेत्सोव्हानं हा सामना 7-5 1-6 7-5 असा जिंकला. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी कुझनेत्सोव्हाला डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचं तिकीट मिळालं होतं.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/WTA/status/790549136827305985