मुंबई:  कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत इंग्लंडचा 75 धावांनी धुव्वा उडवून तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका 2-1 ने खिशात घातली. 4 षटकात 25 धावा देऊन 6 विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल या विजयाचा खरा हिरो ठरला.

मात्र 45 चेंडूत 63 धावा कुटणारा सुरेश रैनानेही धडाकेबाज कामगिरी केली. रैनाने 5 षटकार आणि 2 चौकार ठोकून, भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत तर केलीच.



पण सीमारेषेजवळ अप्रतिम झेट टिपत, उपस्थितांची मनं जिंकली.

यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा धोकादायक फलंदाज बेन स्टोकने फटका लगावला. तो फटका सीमारेषा पार करणार असंच सर्वांना वाटलं. मात्र सीमारेषेजवळ उभा असलेल्या रैनाने हवेत उंच झेप घेत, कॅच घेतला. मात्र त्याचवेळी त्याचा तोल गेला. पण रैनाने एका पायावर तोल सावरत, झेल पूर्ण केला आणि भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर झाला.

VIDEO:



संबंधित बातम्या
चहल हिरो, टीम इंडियाचा इंग्लंडवर 75 धावांनी विजय!

चहल 6 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!

8 धावात 8 विकेट, क्रिकेटचा 71 वर्षांचा इतिहास पुसला!

तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणातच मालिका खिशात, नाम है कोहली!