फलंदाजीची स्फोटक सुरुवात करत सुरेश रैनाने पुनरागमन साजरं केलं. शिवाय त्याने क्षेत्ररक्षणातही चुणूक दाखवली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जेपी ड्युमिनीचा पहिलाच झेल त्याने घेतला. त्यानंतर 18 व्या षटकात विकेटकीपर फलंदाज क्लासेनचा झेल घेत रैनाने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा धुळीला मिळवल्या.
रैनाने घेतलेला झेल :
हे दोन्ही झेल घेतल्यानंतर अखेरच्या षटकातील सर्वात महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात रैनाने मोलाची भूमिका निभावली. 18 व्या षटकात ख्रिस मॉरिसचा झेल घेऊन रैनाने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अनेक दिवसांनी कमबॅक केल्यानंतर सुरेश रैनाची बॅटही तळपली. रैनाने 7 चेंडूंचाच सामना केला, मात्र या 7 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि एक षटकार ठोकत 15 धावा केल्या.
रैनाचा षटकार :