जयपूर पिंक पँथर्स आणि दबंग दिल्लीमधल्या सामन्याआधी सनीने राष्ट्रगीत सादर केलं. राष्ट्रगीताचं गायन हा बहुमान असल्याची प्रतिक्रिया सनीने काही दिवसांपूर्वीच दिली होती.
विशेष म्हणजे सनी लिओनीने राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही. खेळाला प्रमोट करणाऱ्या गोष्टींचं आपण पैसे घेत नसल्याचं सनी लिओनीने स्पष्ट केलं.
दरम्यान, याआधी अनेक अभिनेत्रींना प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावरुन राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये श्रद्धा कपूर, आलिया भट, श्रुती हसन आणि सोनाक्षा सिन्हा यांचा समावेश आहे. मात्र, आज ही संधी अभिनेत्री सनी लिओनीला मिळाली.
संबंधित बातमी