ढाका : बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बसवर दगडफेक केल्याची माहिती आहे. खेळाडूंची बस दुसऱ्या कसोटीनंतर हॉटेलमध्ये परतली तेव्हा बसची काच फुटलेली होती. त्यामुळे बसवर दगडफेक करण्यात आली, असा अंदाज लावण्यात येत आहे.
दरम्यान कोणत्याही खेळाडूला दुखापत झालेली नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) दिली आहे. या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ‘क्रिकइंफो’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.’
खेळाडूंची बस हॉटेलमध्ये परतली तेव्हा काच फुटलेली होती. मात्र यामध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत झालेली नाही. संघाचे सुरक्षा सल्लागार स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. शिवाय घटनेची चौकशीही करण्यात येत आहे. एका छोट्याशा दगडामुळे काच तुटली असावी, असं सीएचे सुरक्षा व्यवस्थापक सीन कारोल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असल्याचं बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली असल्याचंही बीसीबीने स्पष्ट केलं.
बांगलादेशात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर दगडफेक?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Sep 2017 08:37 AM (IST)
ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बस दुसऱ्या कसोटीनंतर हॉटेलमध्ये परतली तेव्हा बसची काच फुटलेली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून या घटनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -