शिमला : भारताविरुद्धच्या मालिकेती पराभवानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मंगळवारी अजिंक्य रहाणेने बीअर पिण्यासाठी बोलावलं. स्मिथने फक्त रहाणेलाच नाही, तर संपूर्ण भारतीय संघाला बीअर पिण्यासाठी निमंत्रण दिलं.


स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये एकाच संघातून खेळतात. त्यामुळे 5 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधी स्टीव्ह स्मिथला सर्व चुका सुधारायच्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चार कसोटी सामन्यांची मालिकेत अनेक कटू अनुभव आले. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

स्मिथच्या ऑफरवर रहाणे म्हणाला...
जेव्हा स्टीव्ह स्मिथने बीअर पिण्याची ऑफर दिल्यानंतर अजिंक्य रहाणेने उत्तर दिलं की, "मी तुझ्याशी नंतर बोलेन." आयपीएलमधी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार स्मिथ म्हणाला की, "आम्ही एकाच संघाचे सदस्य आहोत. पुढील आठवड्यापासून पुन्हा एकत्र असणार."

स्मिथचा माफीनामा

बॉर्डर-गावसकर मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने त्याच्या वर्तणुकीसाठी माफी मागितलं. अनेक वेळ आपण स्वत:च्या विचारात असतो आणि त्यानंतर भावनेच्या भरात अशी चूक होते. कालच्या चुकीबद्दल मी माफी मागतो, असं स्मिथ म्हणाला होता.

मुरली विजयला स्मिथची शिवीगाळ
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जोश हेझलवूडचा झेल मुरली विजयने घेतला. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सेलिब्रेशन करत पॅव्हेलियनकडे निघाले. मात्र पंचांनी हेझलवूडला बाद देण्यास नकार दिला.

पंचांच्या निर्णयानंतर भारतीय खेळाडूंना परत बोलावण्यात आलं तेव्हा मुरली विजय मैदानाकडे धावत येत असताना ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या स्टीव्ह स्मिथने मुरली विजयला शिवी दिली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली

मुरली विजयला शिवी देताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद

'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर!

टीम इंडियाच्या विजयाचे 6 हिरो !

DRSमध्ये बिघाड, पहिल्यांदाच घडलं क्रिकेटच्या इतिहासात...