या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेतली होती. स्टीव्ह स्मिथनेही ही चूक मान्य करत बॉल टेम्परिंग हा रणनितीचाच एक भाग होता, अशी स्पष्ट कबुली दिली होती. शिवाय माफीही मागितली. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत कठोर भूमिका घेत स्टीव्ह स्मिथला राजीनामा देण्यास भाग पाडलं.
काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.
चेंडूशी छेडछाड केल्याची स्मिथकडून कबुली
चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता.
स्मिथला कर्णधारपदावरुन हटवा : ऑस्ट्रेलिया सरकार
ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झालं. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला असल्याचंही ते म्हणाले.
संपूर्ण देशाला शरमेने मान खाली लावायला लावणारी ही घटना आहे. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर कारवाई करेन, अशी अपेक्षा करत असल्याचं टर्नबुल म्हणाले. त्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार आणि उपकर्णधारावर कारवाई केली.
पाहा व्हिडीओ :