रत्नागिरी: रत्नागिरीतील देवरुखमध्ये राज्यस्तरीय बॉक्सर खेळाडूनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
राज्यस्तरावर बॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रफुल्ल कदम याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रफुल्लनं जिल्हा स्तरावरही अनेक बॉक्सिंग सामने जिंकले होते.
प्रफुल्लच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. राज्यस्तरावर चमकणारा प्रफुल्ल जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा खजिनदारही होता.