मोहाली: धर्मशाला वन डेत अब्रू गेलेल्या टीम इंडियाने मोहाली वन डेत फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली. टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने खणखणीत द्विशतक ठोकून, श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. रोहितचं हे कारकिर्दीतील तिसरं द्विशतक ठरलं.


रोहितने 151 चेंडूत द्विशतक झळकावलं. या सामन्यात  रोहित शर्माने 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या.  यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले.

महत्त्वाचं म्हणजे आजच्या सामन्याला रोहित शर्माची बायको रितीकाही उपस्थित होती. बहुतेक चौकार आणि षटकारानंतर रोहित शर्मा गॅलरीत बसलेल्या आपल्या बायकोकडे पाहून फ्लाईंग किस देत होता. रोहित शर्माच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. दुसऱ्या वाढिदिनी तिसरं द्विशतक ठोकण्याचा पराक्रम रोहितने गाजवला आहे.



यापूर्वी  रोहित शर्माने 2 नोव्हेंबर 2013 रोजी  बंगळुरुत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत 158 चेंडूत 209 धावा केल्या होत्या.

मग रोहितने 16 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत 225 चेंडूत 264 धावा केल्या होत्या.

त्यानंतर आज रोहितने श्रीलंकेविरुद्धच मोहालीत त्याने 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या.

रोहित शर्मा हा द्विशतक ठोकणारा पहिला कर्णधार, तर वन डेत तीन द्विशतक ठोकणारा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.

रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा 115 चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या 36 चेंडूत पूर्ण केल्या.



रोहित शर्माच्या टीम इंडियानं मोहालीच्या वन डेत श्रीलंकेला विजयासाठीभलंमोठं 393 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात रोहितनं कर्णधारास साजेशी खेळी उभारून, वन डे कारकीर्दीतलं सोळावं शतक साजरं केलं. त्यानं शिखर धवनच्या साथीनं ११५ धावांची, तर श्रेयस अय्यरच्या साथीनं ११३ धावांची भागीदारी रचली.