नागपूर: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ऑक्टोबरमध्ये कर्जमाफी झाल्याचं सरकार सांगतं. मात्र, अद्याप शेतकऱ्य़ांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. फक्त जाहिराती करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतंय, असा आरोप अजित पवारांनी केला.


तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख एक सांगतात आणि मुख्यमंत्री एक बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पवार बोलत होते.

शेतकरी कर्जमाफीप्रकरणी सरकारची परस्पर विरोधी विधान
24 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, त्यानुसार 15.42 लाख शेतकऱ्यांसाठी 6500 कोटी बँकांमध्ये जमा केले. पण विधानसभा प्रशोत्तरांमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 5 डिसेंबर रोजी 9.43 लाख पात्र कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात 5142 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली.

मुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी परस्पर विरोधी माहिती दिली. त्यामुळे  मग नेमकी खरी माहिती कुणाची, सहकार मंत्र्यांची की मुख्यमंत्र्यांची असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.

मुंबई बँक गैरव्यवहारप्रकरणी विधानसभेत प्रश्न

गैरव्यवहाराबाबतच्या  चौकशीत बँकेच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईकांना क्लीन चीट देण्यात आली.
- कर्ज गैरव्यवहार प्रकरणी बँकेतील अधिकार्‍यांवर खापर
- मुंबई बँकेतील कर्ज प्रकरणांची दक्षता पथकामार्फत चौकशी
- चौकशीत कर्जप्रकरणात तांत्रिक अनियमितता आढळल्या
- या अनियमिततेप्रकरणी बँकेचे दोन शाखा व्यवस्थापक निलंबित

- नातेवाईकांना कर्ज दिल्याचे चौकशीत आढळून आलेले नाही
- तरीही या प्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू आहे

मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चिट
- आमदार प्रवीण दरेकर यांना सरकारचा दिलासा
- बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे सरकारचं प्रशस्तीपत्रक