लंडन : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीकडून 'स्टॅन्ड बाय' हे अधिकृत गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ब्रिटनची गायिका लोरिन आणि रुडिमेंटल या बॅन्डने या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं इंग्लंडच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवतं. 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषकांच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यावेळी मैदानावर आणि विश्वचषकाशी निगडीत कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजवण्यात येणार आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं काऊण्टडाऊन सुरु झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 30 मे पासून सामन्यांना सुरुवात होणार असून 5 जून रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारतीय संघात कोण कोण? कर्णधार: अनेक महिन्यांपासून भारतीय संघाचं यशस्वी नेतृत्त्व करणारा विराट कोहली विश्वचषकात नेतृत्त्व करणार आहे. उपकर्णधार: रोहित शर्मा उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडेल. रोहित शर्मानेही त्याच्या नेतृत्त्वात टीम इंडियासाठी महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून नेतृत्त्व गुण सिद्ध केलं आहे. यष्टीरक्षक: विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीबाबत कोणतीही शंका नाही. पण टीम इंडियामध्ये दुसऱ्या विकेटकीपरबाबत सुरु असलेला वाद संपला आहे. बॅकअप विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं आहे. दिनेश चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करुन टीम इंडियाच्या अडचणी दूर करु शकतो. शिवाय गरज असल्यास जलद फलंदाजीही करु शकतो. एकीकडे दिनेश कार्तिकची कामगिरी मागील दीड वर्षात चांगली आहे. यामुळेच रिषभ पंतऐवजी त्याला संधी देण्यात आली आहे. मधली फळी: टीम इंडियाच्या मधल्या फळीत विराट कोहली, एमएस धोनीसह केदार जाधव, विजय शंकर संघात महत्त्वाची भूमिका बजावतील. विजय शंकरची मागील काही महिन्यांमधील कामगिरी उत्तम आहे. भारतीय संघावर एक कटाक्ष : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश संघात करण्यात आला आहे. भारत-पाक भिडणार आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दोन वर्षांपूर्वी ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आले होते. यावेळी पाकिस्तानने 180 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारत पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रविवारी 16 जून 2019 रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताचे सामने : दिनांक - प्रतिस्पर्धी संघ बुधवार 5 जून - द. आफ्रिका रविवार 9 जून - ऑस्ट्रेलिया गुरुवार 13 जून - न्यूझीलंड रविवार 16 जून - पाकिस्तान शनिवार 22 जून - अफगाणिस्तान गुरुवार 27 जून - वेस्ट इंडिज रविवार 30 जून - इंग्लंड मंगळवार 2 जुलै - बांगलादेश शनिवार 6 जुलै - श्रीलंका मंगळवार 9 जुलै - उपान्त्य फेरी 1 भारताकडे काय आहे? जगातील सर्वोत्कृष्ट तीन क्रिकेटपटू जगातील सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज दोन उत्कृष्ट जलदगती गोलंदाज जगातील दोन उत्तम फिरकीपटू अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज भारताकडे काय नाही? मधळ्या फळीतला डावखुरा फलंदाज डावखुरा जलदगती गोलंदाज प्रस्थापित मधली फळी दहा षटकं टाकू शकेल असा अष्टपैलू जो दोन प्रमुख गोलंदाजांना साथ देईल. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.