शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सर्वात वेगवान महिला धावपटू ठरण्याचा विक्रम दुती चंदच्या नावावर जमा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दुतीने रौप्य पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर (धावणे) इव्हेंटसाठी पात्र ठरणारी ती भारताच्या इतिहासातील तिसरीच महिला आहे.
ऑनलाईन ट्रोल झालेल्या पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू
आपल्या जोडीदाराला अनावश्यक त्रास भोगावा लागू नये, यासाठी तिची ओळख जाहीर करण्याचं दुतीने टाळलं. 'मला माझी सोलमेट मिळाली आहे. तुम्हाला ज्याच्यासोबत राहण्याची इच्छा आहे, त्याच्यासोबत राहण्याचं स्वातंत्र्य असावं, यावर माझा विश्वास आहे. समलैंगिक नातेसंबंधांमध्ये राहणू इच्छिणाऱ्यांना मी कायमच पाठिंबा दिला आहे. माझं लक्ष सध्या वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि ऑलिम्पिककडे आहे. पण भविष्यात मला 'तिच्या'सोबत सेटल व्हायचं आहे.' अशा भावना दुतीने व्यक्त केल्या.
सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी समलैंगिक संबंधांना गु्न्हेगारी ठरवणाऱ्या कलम 377 मधील अटी शिथिल केल्यानंतर अनेक जणांनी मोकळेपणाने याविषयी बोलण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय फेडरेशनविरोधात दुतीला गेल्या वर्षी स्वतःची लैंगिक ओळख क्रीडा लवाद न्यायालयात सिद्ध करावी लागली होती.