IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमात चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा रस्ता आता कठिण झाला आहे. अर्ध्या सिझनपर्यंत टॉपवर असलेल्या दिल्लीला सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं आता त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर दुसरीकडे सनराइजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला 88 धावांनी पराभूत करत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
दिल्लीला प्ले ऑफ क्वालीफाय करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. मात्र उर्वरित दोन सामन्यात दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्स आणि बेंगलोरशी होणार आहे. त्यामुळं दिल्लीचा रस्ता कठिण मानला जात आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळं आज प्ले ऑफमध्ये जाणाऱ्या पहिल्या संघावर शिक्कामोर्तब होणार आहे.
आयपीएलच्या 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी विजय मिळवला. रिद्धीमान साहा, रशीद खान आणि डेविड वॉर्नर हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. हैदराबादने धावांचा डोंगर उभारत दिल्ली समोर 220 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने संघ अवघ्या 131 धावांवर गारद झाला. या विजयासह हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये सहाव्या नंबर पोहोचली आहे.
रशीद खानच्या फिरकीसमोर दिल्लीचे खेळाडू टिकू शकले नाहीत. रशीद खानने 4 षटकांत 7 धावा देत 3 विकेट घेतल्या. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 26, शिमरॉन हेटमायरने 16, तुषार देशपांडेने 20 धावा केल्या. दिल्लीचे इतर खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. हैदराबादकडून रशीद खानने 3, संदीप शर्मा आणि नजराजनने 2 तर शाहबाज नदीम, जेसन होल्डर आणि विजय शंकरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी टॉस जिंकून प्रथन फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात दमदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि रिद्धिमान साहाने पहिल्या विकेटसाठी 9.4 षटकांत 107 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने 34 चेंडूत 66 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर साहाने मनीष पांडेसमवेत दुसर्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. साहाने 45 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत साहाने 12 चौकार आणि 2 षटकार लगावले.
170 धावांत दोन विकेट गेल्यानंतर मनीष पांडे आणि केन विल्यमसन यांनी 49 धावांची नाबाद भागीदारी केली. पांडेने 31 चेंडूंत नाबाद 44 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीमधून चार चौकार आणि एक षटकार लगावला. विल्यमसन 10 चेंडूत 11 धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून आर अश्विन आणि एनरिक नॉर्टजे प्रत्येकी एक विकेट घेतली.
IPL 2020: अर्ध्या सिझनपर्यंत नंबर वन असलेल्या दिल्लीवर प्ले ऑफमधून बाहेर होण्याचं संकट!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2020 09:45 AM (IST)
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमात चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा रस्ता आता कठिण झाला आहे.
अर्ध्या सिझनपर्यंत टॉपवर असलेल्या दिल्लीला सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं आता त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -