Spinners in World Cup 2023: विश्वचषक 2023 मध्ये एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत आणि आतापर्यंत 28 सामने खेळले गेले आहेत. सर्व संघांसाठी किमान 5-5 सामने खेळले गेले आहेत. म्हणजे टूर्नामेंट अर्ध्याहून अधिक संपली आहे. इतक्या सामन्यांनंतर सर्वच संघांच्या फिरकी विभागाचे विश्लेषण केले, तर जगातील सर्वोत्तम फिरकी आक्रमण असल्याचे म्हटल्या जाणार्‍या टीम इंडियाची पिछेहाट झालेली दिसते.


हे थोडं आश्‍चर्यकारक नक्कीच आहे पण हे खरं आहे. वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीला अधिक मदत करणाऱ्या भारतीय खेळपट्ट्यांवर आतापर्यंत भारतीय फिरकीपटू फारसा रंग पसरवू शकलेले नाहीत. याउलट परदेशी फिरकीपटू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. परिस्थिती अशी आहे की या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे दोन गोलंदाज परदेशी फिरकीपटू आहेत. या यादीत भारतीय फिरकीपटू दूरवरही दिसत नाहीत.


झाम्पा आणि सॅन्टनरची जोरदार हवा


2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याने आतापर्यंत 16 विकेट घेतल्या आहेत. यानंतर किवी फिरकीपटू मिचेल सँटनरचा क्रमांक लागतो. सँटनरच्या खात्यातही 14 विकेट जमा आहेत. याउलट, भारताचा कुलदीप यादव 8 विकेट्ससह 17 व्या आणि रवींद्र जडेजा 7 विकेट्ससह 24 व्या स्थानावर आहे.






भारतीय फिरकी गोलंदाजांची आकडेवारी सरासरी फिरकीपटूंसारखी


कुलदीप आणि जडेजा यांनी घेतलेल्या विकेट्सची संख्या इतर सरासरी परदेशी फिरकीपटूंनी घेतलेल्या विकेट्सच्या जवळपास आहे. नेदरलँड्सच्या आर्यन दत्तने 8 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने 7 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सीने केवळ 2 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. ग्लेन फिलिप्ससारख्या फलंदाजानेही आपल्या फिरकी गोलंदाजीने 6 बळी घेतले आहेत. एकूणच, टीम इंडियाचे फक्त स्पिनर्सच फिरकीला अनुकूल विकेट्सवर जादू दाखवू शकत नाहीत, इतर फिरकी गोलंदाज इथे आपली भूमिका चोख बजावत आहेत.






इतर महत्वाच्या बातम्या