मुंबई: फिरकी गोलंदाजी सहजतेनं खेळणं जमत नसलेल्या फलंदाजांना आता त्यांच्या तंत्रातला दोष दूर करण्याची संधी मिळणार आहे.

फिरकी गोलंदाजी खेळण्याचं तंत्र विकसित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विन्टॉन डी कॉकनं चक्क एक मॅट बनवलं आहे.

स्पिनटेक्स स्पिन मॅट या नावानं ओमटेक्स कंपनीनं ते भारतीय बाजारात आणलं आहे. अनिल कुंबळे आणि मुरलीधरनसारख्या फिरकी गोलंदाजांचा सहज सामना करण्याच्या दृष्टीनं या मॅटवर तंत्र घोटता येऊ शकेल, असा दावा डी कॉकनं केला आहे.

फिरकी खेळण्याचं आपलं तंत्र चांगलं नव्हतं याची कबुलीही त्यानं दिली. तो दोष दूर करण्याच्या प्रयत्नांमधूनच स्पिन मॅटचा शोध लागल्याची माहिती त्यानं दिली.

आयपीएलमध्ये क्विंटन डी कॉक विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळतो.

VIDEO: