कोलकाता : विराट कोहलीचा भारतीय संघ कसोटी मालिकेत इंग्लंडवर विजय मिळवेल, असा विश्वास टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गांगुलीने भारतीय संघाबद्दल विश्वास व्यक्त केला.


भारत विरुद्ध इंग्लंड, संपूर्ण वेळापत्रक

भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. आता भारतीय संघ इंग्लंडला सामोरं जाणारं आहे.


गांगुली म्हणाला, "भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडप्रमाणेच टीम इंडिया आता आणखी एक व्हॉईटवॉश देईल, असा मला विश्वास आहे. इंग्लंडने सतर्क राहायला हवं"


यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही इंग्लंडची फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचं म्हटलं होतं. तसंच फिरकी गोलंदाजांना सामोरं जाताना फलंदाजही अडखळत होते, हे बांगलादेशात दिसून आलं, असं वॉन म्हणाला.

भारताच्या अश्विन आणि रवींद्र जाडेजासारख्या उत्तम फिरकीपटूंना सामोरं जाताना, इंग्लंडला प्रचंड सावधानता बाळगायला हवी, असंही वॉनने नमूद केलं.

संबंधित बातम्या

भारत विरुद्ध इंग्लंड, संपूर्ण वेळापत्रक

मुरली विजयसोबत सलामीला कोण?

ईशांत शर्माचं पुनरागमन, रोहित शर्माला विश्रांती

'धोनीला कर्णधारपदावरुन हटवलं, तर भारताची ती मोठी चूक ठरेल'