मुंबईकरांना गारेगार प्रवासाचं स्वप्न, एसी लोकलची चाचणी पुन्हा सुरु
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 03 Nov 2016 09:06 AM (IST)
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी सज्ज असलेल्या एसी लोकलची चाचणी आजपासून पुन्हा होणार आहे. येत्या दोन आठवड्याभरात एसी लोकलच्या तांत्रिक चाचण्या केल्या जाणार आहेत. दोन आठवड्यांच्या चाचण्यांनंतर पुढच्या वर्षी ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत प्रत्यक्ष रुजू होणार आहे. ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर ही लोकल चालवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. 54 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल सहा महिन्यांपूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली.