विशाखापट्टणम: नोटाबंदीनंतर सोशल मीडियातून चर्चेत आलेल्या 'सोनम गुप्ता'बाबत आता क्रिकेटच्या मैदानावरही चर्चा सुरु झाली आहे. पाहा 'सोनम गुप्ता बेवफा है' या प्रश्नावर क्रिेकेटमधील दिग्गजांचं काय म्हणणं आहे.


विशाखापट्टणममध्ये झालेल्या भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या वेळी कॉमेंट्री बॉक्स ते चेंजिंग रुमपर्यंत बरंच खेळीमेळीचं वातावरण होतं. टीम इंडियाचा माजी फलंदाज आकाश चोप्रानं त्यावेळी थोडा मस्तीच्या मू़डमध्ये दिसून आला. कमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या सगळ्यानाच त्यानं 'सोनम गुप्ता बेवफा है' हा प्रश्न विचारुन हैराण केलं. पण या क्रिकेटर्सनही त्याला चांगलीच उत्तरं दिली.

आकाशनं सगळ्यात आधी डीन जोन्सला प्रश्न विचारला की, सोनम गुप्ता बेवफा आहे? यावर जोन्स म्हणाला की, मला याबाबत काहीही माहित नाही. मी फक्त क्रिकेटबाबत जाणतो. हाच प्रश्न त्यानं माजी क्रिकेटर किरण मोरे यांना विचारला. त्यावेळी मोरेही म्हणाले की, मला माहित नाही की, ही सोनम गुप्ता कोण?


यानंतर आकाशनं व्हीव्हीएस लक्ष्मणला विचारलं की, सोनम गुप्ता बेवफा क्यो है? यावर लक्ष्मणननंही भारी उत्तर दिलं. लक्ष्मण म्हणाला की, 'मला वाटतं की, सोनम गुप्ता बेवफा आहे. कारण की, आकाश म्हणतो म्हणजे बरोबरच असेल. आकाश नेहमी बरोबरच बोलतो...'

माजी कर्णधार, कपिल देव यांनाही आकाशनं विचारलं की, सोनम गुप्ता बेवफा है? त्यावेळी कपिल देव म्हणाले की, 'मला वाटत नाही सोनम गुप्ता बेवफा असेल. सोनम गुप्ता बेवफा हो ही नही सकती.'

ही सगळी मजामस्ती आकाश चोप्रानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली असून त्यानं हा व्हिडिओ आपल्या फेसबूक पेजवर शेअरही केला आहे.

VIDEO: पाहा कॉमेंट्री रुममधील धमाल मस्ती: