पदक मिळेल असा विचारही केला नव्हता- पीव्ही सिंधू
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2016 05:08 AM (IST)
रिओ द जनैरोः रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वहिलं रौप्य पदक मिळवून दिल्यानंतर बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. ऑलिम्पिकच्या सुरुवातील पदक मिळेल असा विचारही केला नव्हता, अशा शब्दात सिंधूने आपला आनंद व्यक्त केला आहे. महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत सिंधूने वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटन खेळाडू कॅरोलिना मरिनचा मुकाबला केला. या सामन्यात सिंधूला पराभव स्विकारावा लागला असला तरी तिने रौप्य पदकाची कमाई करत भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला आहे. देशासाठी रौप्य पदक मिळवता आलं, याचा अभिमान आहे. मात्र सुवर्ण पदक मिळालं असतं तर अजून चांगलं वाटलं असंत. पण जो काही खेळ केला तो चांगला केला, कारण पदक जिंकेल असा विचारही केला नव्हता, असं सिंधूने सांगितलं. संबंधित बातम्याः