मुंबई: रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं काल सुवर्ण पदकाची लढत जरी गमावली असेल तरीही तिनं कोट्यवधी भारतीयांचं मनं जिंकली आहेत.   भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या पीव्ही सिंधूवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होता. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून अनेक बड्या कलाकारांनीही तिच्या जिद्दीचं कौतुक केलं.   बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी देखील ट्विटरवरुन सिंधुचं कौतुक करुन तिला प्रोत्साहन दिलं आहे. सुपरस्टार सलमान खान यानंही आपल्या खास शैलीत सिंधुच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.     सलमान खाननं ट्वीट केलं आहे की, 'आईसोबत सिंधुची फायनल मॅच पाहतोय, आईला मी सांगितलं... "माझा सिंधूसोबत फोटो आहे.".. अभिमान वाटतो.'   सलमानचं हे ट्वीट आतापर्यंत हजारो जणांनी रिट्वीट केलं आहे.