रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवून देणाऱ्या पीव्ही सिधूंन अंतिम सामन्यानंतर 'एबीपी माझा'ला खास मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने आपल्या तीन महिन्यांचा प्रवासही उलगडला. सर्वात महत्वाचं म्हणजे या तीन महिन्यात कोच गोपीचंद यांनी तिला अजिबात मोबाइल दिला नव्हता. या आणि अशाच गोष्टींमुळे आपण इथवर पोहचू शकलो असं सिंधूचं म्हणणं आहे.

 

'माझ्या आयुष्यातील तो क्षण अविस्मरणीय आहे'

 

'मी रौप्य पदक स्वीकारालं आणि तिरंगा जेव्हा फडकला तेव्ही मी प्रचंड भावूक झाली होती. तो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता. पहिल्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं हिच गोष्टच मला समधान देणारी आहे.' असं सिंधू म्हणाली.

 

'तुम्हाला काही तरी कमावण्यासाठी काही तरी गमवावं लागतं'

 

कोच गोपीचंद यांनी तीन महिने सिंधूकडून कठोर मेहनत करुन घेतली याच काळात त्यांनी तिला मोबाइलही हाती दिला नाही. त्यामुळे तू तीन महिने मोबाइलशिवाय कशी काय राहू शकली? या प्रश्नावर सिंधूनं फारच समर्पक उत्तर दिलं.

 

'तुम्हाला काही तरी कमावण्यासाठी काही तरी गमवावं लागतं. त्याचा निकाल आज पाहायला मिळतो आहे. सरांनी मला तीन महिने मोबाइल दिला नव्हता ही गोष्ट खरी आहे. पण आज पदक माझ्या हातात आहे. माझ्यासाठी ते लक्ष्य महत्वाचं होतं. जे मी जवळजवळ पूर्ण केलं.'

 

'लवकरात लवकर भारतात परतायचं आहे'

 

'मी सेलिब्रेशन तर करेनच पण आता लवकरात लवकर भारतात परतायचं आहे. इथं मला चाहत्यांचा मिळालेला पाठिंबाही खूपच चांगला होता. मला अजिबात वाटलं नाही की, मी परदेशात खेळत आहे.' असंही सिंधू म्हणाली

 

'माझ्यासाठी गोपीचंद यांनी बरंच काही त्याग केलं आहे'

 

मी आज इथं जी काही आहे ती फक्त आणि फक्त कोच गोपीचंद यांच्यामुळे. कोच किंवा मेन्टोर म्हणून त्यांनी माझ्यासाठी बरंच काही त्याग केला आहे. ते प्रवासातही कायम माझ्यासोबत होते. आजही ते माझी काळजी घेतात. त्यांचे मनापासून आभार!

 

VIDEO: