Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं  तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. स्टीपलचेसमधील भारताचा आघाडीचा खेळाडू अविनाश साबळे याचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. शनिवारी येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नाही. अविनाश साबळे याने पहिल्या शर्यतीत निराशाजनक कामगिरी केली. अविनाश साबळे याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने तीन हजार मीटर हे अंतर पार करण्यासाठी 8:22.24 इतका कालावधी घेतला. 


अविनाश साबळे यांच्या ट्रेनिंगचा खर्च मागील काही महिन्यांपासून क्रीडा मंत्रालयामाऱ्पत केला जात आहे. विश्व चॅम्पियनशीपच्या तयारीसाठी विदेशात त्याने ट्रेनिंग घेत होता, त्यामुळे त्याला देशांतर्गंत स्पर्धेत सहभाग न घेण्याची सूट मिळाली होती. 
 
अविनाश साबळे फायनलसाठी क्वालिफाय करेल, अशी आपेक्षा सर्वांनाच होते. पण साबळे याच्या कामगिरीमुळे सर्वजण निराश झाले आहे. साबळे याने तीन हजार मीटरसाठी 8:22.24 इतका वेळ घेतला. त्याचा आधीचा विक्रम आठ मिनिट 11.20 सेकंद इतका आहे. पण आता त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. साबळे याच्याकडून फायनलमध्ये पदकाची आपेक्षा होती, पण त्यावर आता पाणी फेरलेय. इतर खेळाडू स्पर्धेत कशी कामगिरी करतात, याकडे आता लक्ष लागलेय.


घरची परिस्थिती बेताची 


अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजानं पैसे काढले आणि त्याचे शिक्षण आणि सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली, तरीही त्यातला खेळाडू शांत बसाला नाही, त्यानं आपली जिद्द सोडली नाही.