पुणे : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पुण्यात खेळवण्यात आलेल्या आयपीएल लढतीत राजस्थानचा 64 धावांनी धुव्वा उडवला. चेन्नईचा चार सामन्यातला हा तिसरा विजय ठरला. या विजयासह चेन्नईने पदकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली.
या सामन्यात चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. पण चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर राजस्थानचा डाव अवघ्या 140 धावांत आटोपला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 45 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. चेन्नईच्या दीपक चहर, शार्दूल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर शेन वॉटसनने आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमातलं दुसरं शतक ठोकलं. त्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना अवघ्या 51 चेंडूत शतक साजरं केलं. वॉटसनने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह 106 धावांची खेळी उभारली. वॉटसनचं आयपीएलमधलं हे आजवरचं तिसरं शतक ठरलं.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात ख्रिस गेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिलं शतक नोंदवलं होतं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेन वॉटसनचं आयपीएलमधलं तिसरं शतक, राजस्थानवर दणदणीत विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2018 09:23 AM (IST)
चेन्नईचा चार सामन्यातला हा तिसरा विजय ठरला. या विजयासह चेन्नईने पदकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -