कोलकाता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने आणखी एक आरोप केला आहे. फोन हरवल्यापासून शमीच्या वर्तणुकीत बदल झाला, असा आरोप पत्नी हसीन जहाने माध्यमांसमोर येऊन केला. नातं चांगलं रहावं असं शमीला वाटत असेल तर आपण सहकार्य करण्यासाठी तयार आहोत, असंही तिने सांगितलं.


मोहम्मद शमीने एबीपी न्यूजशी बोलताना आपली बाजू मांडली होती. त्यानंतर लगेचच हसीन जहाने नवा आरोप केला. शमी आपला फोन हरवल्याच्या भीतीने माझ्याशी चांगला वागत होता, असं हसीन जहा म्हणाली. शमीसोबत होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्याबाबत बोलताना हसीनने हा आरोप केला.

''जेव्हा बीएमडब्ल्यू कारमधून मला मोबाईल मिळाला तेव्हा शमीला सांगितलं की, हे तू अजूनही सुरळीत करु शकतोस. मात्र त्याने ऐकलं नाही. त्यानंतर मला मजबुरीने सोशल मीडियावर पोस्ट टाकावी लागली,'' असं हसीन म्हणाली.

''योगायोगाने हा फोन कारमधून माझ्या हाती लागला, नाहीतर शमीने आतापर्यंत मला घटस्फोटाची नोटीसही पाठवली असती,'' असा आरोपही हसीनने केला.

दरम्यान, संवादातून हा वाद सोडवण्याच्या प्रश्नावर हसीनने मवाळ होत उत्तर दिलं. ''त्याला घर वाचवायचं असेल तर याबाबत विचार करु शकते. मात्र चर्चेने प्रकरण सोडवण्यासाठी तयार होणं ही माझी चूक ठरेल,'' असंही हसीन म्हणाली.

दरम्यान, ''शमीने या प्रकरणी जे स्पष्टीकरण दिलंय, ते तोडून-मोडून सांगितलं आहे. त्यामुळे जे सत्य आहे, ते चौकशीतून समोर येईलच,'' असंही हसीनने सांगितलं.

संबंधित बातम्या :

पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी


पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत


ती अत्यंत महत्त्वकांक्षी महिला, हसीन जहाच्या पहिल्या पतीचं वक्तव्य