बांगलादेशचा राखीव खेळाडू नुरुल हसनवरही मानधनाच्या २५ टक्के रकमेचा दंड आणि एक दंड गुण अशी कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशच्या डावातल्या अखेरच्या षटकात दुसरा बाऊन्सर नोबॉल न देण्याच्या पंचांच्या निर्णयावर कर्णधार शकिब अल हसन जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानं फलंदाजांनाही मैदानातून माघारी बोलावलं होतं.
नेमकी घटना काय?
टी-20 तिरंगी मालिकेतील बांगलादेश-श्रीलंका निर्णायक सामन्यात बरेच चढउतार पाहायला मिळाले. या सामन्यात शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊंसर असल्यानं नो बॉल असल्याचं सांगत मैदानाबाहेर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे खेळ काही काळ थांबला.
यावेळी शाकीबनं फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये परतण्याच्या सूचना केल्या. पण त्यानंतर सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हस्तक्षेप करत सामना पुन्हा सुरु केला. मात्र सामना संपल्यावरही बांगलादेशी आणि श्रीलंकनं खेळाडूंची बाचाबाची झाली. यावेळी बांगलादेशचे प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श आणि पंचांनी खेळाडूंना शांत केलं.
VIDEO :
संबंधित बातम्या :