सहकारमंत्र्यांच्या बंगल्याच्या सुनावणीवेळी खुद्द पालिका आयुक्त गैरहजर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2018 04:50 PM (IST)
खुद्द पालिका आयुक्त आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्यानं याची तारीख पुढं ढकलण्यात आली आहे.
NEXT
PREV
सोलापूर : सोलापूर महापालिकेत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची होणारी सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. कारण, खुद्द महापालिका आयुक्त आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्यानं, याची तारीख पुढं ढकलण्यात आली आहे.
आरक्षित जागेत बंगला बांधल्याप्रकरणी सहकारमंत्र्यांची आज महापालिकेत सुनावणी होणार होती. मात्र, आयुक्त मुंबईला बैठकीला गेल्याचं सांगत सुनावणी रद्द केल्याचं याचिकाकर्त्यांना ऐनवेळी पालिकेकडून सांगण्यात आलं.
पालिकेच्या या गलथानपणामुळं याचिकाकर्ते महेश चव्हाण यांना आज चांगला मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, बंगल्यासंबंधी प्रत्येक बाबीसाठी आपण जबाबदार राहू, असं प्रतिज्ञापत्र देशमुख यांनी महापालिकेला दिलं होतं. त्यानंतर महापालिकेने बांधकामासाठी सशर्त परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं.
संबंधित बातम्या
आज ठरणार... सहकारमंत्र्यांचा बंगला कायदेशीर की बेकायदेशीर?
सुभाष देशमुखांचा बंगला बेकायदेशीरच?
आरक्षित जागेवर बंगला, सहकार मंत्री सुभाष देशमुखांना नोटीस

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -