सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या असून, यामध्ये, ''हॅपी बर्थडे एल बॉर्डर. लहानपणी मी एक विनोद ऐकला होता. पण बॉर्डरसाहेब आम्ही 'बॉर्डर' नावचा चित्रपटच बनवला. तुम्ही अजून गावस्कर बनवू शकला नाही.आता तेंडुलकरला तरी तयार करा.'' असे म्हटले आहे.
सेहवागच्या या विनोदी शैलीमुळे सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक प्रतिक्रीयेची वाट पाहात असतात. यापूर्वी देखील सेहवागने आपल्या हटके स्टाईलमध्ये अनेक सेलिब्रेटींना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकतेच सेहवागने ट्विटरवरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलची खिल्ली उडवली होती. त्यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती.