गेलला खरेदी करताच सर्व फ्रँचायझींनी पंजाबचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. मात्र त्याचं संघात असणंच पुरेसं आहे, अशी प्रतिक्रिया पंजाबचा मेंटॉर आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिली. सलामीवीर फलंदाज म्हणून तो कोणत्याही संघासाठी धोकादायक आहे, असं सेहवाग म्हणाला.
संघ व्यवस्थापन गेलकडे पर्यायी सलामीवीर फलंदाज म्हणून पाहत आहे. ''गेलची ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे. त्याच्यावर संघाने दोन कोटी रुपये खर्च केले, मात्र मार्केटिंग स्ट्रॅटेजीनुसार हे फायदेशीर आहे. तो जास्त सामने खेळू शकणार नाही. मात्र एक बॅकअप सलामीवीर फलंदाज म्हणून संघात असेल,'' असं सेहवाग म्हणाला.
ख्रिस गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजारपेक्षा जास्त धावा आणि 20 शतकं आहेत. जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी-20 लीगमध्ये गेलने चांगली कामगिरी केली आहे. मात्र गेल्या आयपीएल मोसमात अपयशी ठरल्याने त्याच्याबाबत फ्रँचायझी अनुत्सुक दिसून आले.
संबंधित बातम्या :