- ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागूं यांच वयाच्या 92 व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा, उद्या पुण्यात अंत्यसंस्कार
- मार्च आणि एप्रिल अशा दोन टप्प्यात शेतकरी कर्जमाफी, सूत्रांची माहिती, कर्जमाफीच्या आढाव्यासाठी सरकारकडून पथकाची नियुक्ती, बँकांकडूनही माहिती मागवली
- भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची नागपुरात पवारांसोबत गुफ्तगू, राजकीय चर्चांना उधाण, खडसे-पवार भेट वैयक्तिक असल्याचा नवाब मलिक यांचा दावा
- नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, महापौर थोडक्यात बचावले, पोलिसांचा तपास सुरु
- नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, तर कायदा मागे घेण्याची विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी, अमित शाहांचा मात्र नकार
- विशाखापट्टणममध्ये आज भारत-वेस्ट इंडिज दुसरा एकदिवसीय सामना, मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया सज्ज
LIVE BLOG | आज दिवसभरात... 18 डिसेंबर 2019
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2019 07:38 AM (IST)
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in महत्त्वाच्या हेडलाईन्स