भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 11:16 AM (IST)
मुंबई : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे. सैन्याच्या कारवाईवर देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वच राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूंनी सैन्य आणि पंतप्रधानांचं कौतुक करत आभार मानले आहेत. या कारवाईनंतर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनेही प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारु नये, असं ट्वीट शाहिद आफ्रिदीने केलं आहे.