सुरतमधील कार्यक्रमात 2 कोटींची उधळण, रक्कम शहीदांच्या कुटुंबीयांना देणार
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 08:44 AM (IST)
सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये एका सांगीतिक कार्यक्रमात गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर तब्बल 2 कोटी रुपयांची उधळण करण्यात आली. मात्र या कार्यक्रमात जमा झालेली रक्कम शहीद जवानांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सुरतचे व्यापारी महेश सवाणीने उरी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी 'वतन के रखवाले' हा भजन कार्यक्रम आयोजित केला होता. या पुरुष, महिलांसह लहान मुलांनीही पैसे उडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमात सुमारे 2 कोटी रुपयांचा अक्षरश: पाऊस पडला. जमा झालेले सर्व पैसे शहीद जवानांच्या नातेवाईकांना मदत म्हणून दिले जाणार आहेत. कार्यक्रमाचा हेतू चांगला असला तरी अशा पद्धतीने पैसे उधळल्याने या कार्यक्रमावर टीका होत आहे.